राजकीय

ब्रेकिंग! राज्यात कोणाची सत्ता येणार?

राज्यात नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. आहेत. त्यामुळे आता राज्यात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. दरम्यान टाइम्स नाऊ नवभारत या वृत्तवाहिनीसाठी मॅट्रिझने सर्व्हे केला आहे. ज्यानुसार, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील अनेक लोकांना प्रश्न विचारण्यात आले. 
दरम्यान, सर्व्हेची जी आकडेवारी समोर आली आहे त्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी नक्कीच वाढू शकते. कारण आज घडीला जर महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर महायुतीला पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकते, असे चित्र आहे. पण त्यांना स्पष्ट बहुमत मिळेल असं सर्व्हेत दिसत नाही. बहुमतासाठी जो 145 चा आकडा आहे, त्यापासून महायुती काहीशी दूर असल्याचे सर्व्हेत दिसत आहे. 
दुसरीकडे महाविकास आघाडी मात्र, 100 च्या आसपास जागांवरच विजय मिळवू शकेल, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button