महाराष्ट्र

हिंमत असेल तर एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना महायुती सरकारच्या संकल्पनेतून आकाराला आली आहे. या योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुण्यात शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे. राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरुपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 
प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सरकारकडून या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.दरम्यान एका व्हायरल मेसेजमुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 
शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअपचा स्क्रिन शॉट सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हॉट्सअप मेसेजमध्ये म्हटले आहे की, लाभार्थी महिलांना आज बालेवाडी येथील कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. ज्या महिला महिला या कार्यक्रमाला येणार नाहीत. त्याचा फॉर्म रद्द होईल. 
हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर खा. सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सुळे यांनी ट्टिटवर एक पोस्ट करत म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात आहेत. 
बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार. अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहीण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच.

Related Articles

Back to top button