महाराष्ट्र

अगं बाई अरेच्चा! लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला भावाला

  • राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या भलतीच चर्चेत आहे. या योजनेच्या पहिल्या दोन हफ्त्यांचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात झाली आहे.
  • राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ चक्क एका पुरुषाला मिळाला असून त्याच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. विशेष म्हणजे या भावाने ना कोणता अर्ज केला होता,ना कोणती कागदपत्र दिली होती, तरीही त्याच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. या प्रकरणमुळे योजनेतील भोंगळ कारभार समोर आला आहे.
  • हा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे घडला आहे. जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. तो आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहे. 
  • जाफर हा सुशिक्षित बेरोजगार आहे. त्याने लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही अर्ज केला नसताना त्याच्या बँक ऑफ बडोदाच्या खात्यात योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले. खात्यात जमा झालेली रक्कम पाहून तो चक्रावून गेला. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी दिवसभर रांगेत थांबून अर्ज भरला, कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ केली. 
  • मात्र बँक खात्याला आधार लिंक नसल्याने अनेक पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. दुसरीकडे कोणताही अर्ज न करता एका पुरुषाच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने प्रशासनाच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Related Articles

Back to top button