सोलापूर

सोलापूर! भाजी विक्रेती खून प्रकरण ; आणखी एक महिला आरोपी

सोलापूर (प्रतिनिधी) ६० वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेचा सोन्याच्या दागिन्यासाठी खून केल्याच्या गुन्ह्यात आणखी एक महिला आरोपी निष्पन्न झाली आहे. या गुन्ह्यात अटकेत असलेल्या दोन आरोपींची पोलीस कोठडीची मुदत आणखी तीन दिवसांनी वाढविण्यात आली आहे.या तिन्ही आरोपींना १९ ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयापुढे उभं करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक साळुंखे उर्फ बंदूख्या व त्याची पत्नी अर्चना साळुंखे यांना न्यायालयासमोर हजर केले असता, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी डी.आर भोला यांनी त्यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली. दरम्यान पोलीस तपासात आणखी एका महिलेचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर तिला अटक करण्यात आली.न्यायालयाने तिची ही पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील वैशाली बनसोडे तर आरोपी तर्फे अॅड. विनोद कांबळे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button