सोलापूर
सोलापुरात भयंकर घटना

सोलापूर : बेडरूममध्ये जाण्यास प्रतिबंध केल्याने सख्ख्या भावाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भावाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान उत्तर सदर बझार गेंट्याल टॉकीजच्या बाजूला) घडली.याप्रकरणी श्रीनिवास नारायण पोबत्ती (वय-४४,रा.उत्तर सदर बझार गेंट्याल टॉकीजच्या बाजूला) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पुरुषोत्तम नारायण पोबत्ती (वय-५४,रा.उत्तर सदर बझार, गेंट्याल टॉकीजच्या बाजूला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा मुलगा कुणाल याने फिर्यादी यांचा भाऊ पुरुषोत्तम याला बेडरूमला लावलेली चावी काढून आम्हाला बेडरूम वापरायला द्या असे म्हणाले असता, पुरुषोत्तम याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून बेडरूममध्ये जाण्यास प्रतिबंध केला.त्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व बेडरूमला कुलूप लावून फिर्यादी व त्यांच्या पत्नीस, मुलाला बेडरूममध्ये जाण्यास प्रतिबंध केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल इप्पलपल्ली हे करीत आहेत.