क्राईम
तरुणीवर ओढवला भयंकर प्रसंग

- कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरण ताज असताना असाच एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडमधील नर्सवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्याच्या सीमेवर नर्सचा मृतदेह सापडला आहे. तस्लीम जहाँ असे मृत नर्सचे नाव आहे. तस्लीमला मारहाण करून जखमी केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार करून स्कार्फने गळा आवळून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. तिच्या चेहऱ्यावर दगडाने हल्ला करून मृतदेह झुडपात लपवून ठेवण्यात आला होता. हत्येनंतर आरोपी पैसे व मोबाईल घेऊन पसार झाला. पोलिसांनी बरेली येथील आरोपीला राजस्थानमधून अटक करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
- अधिक माहिती अशी की, वसुंधरा एन्क्लेव्ह, डिबडीबा, बिलासपूर येथे राहणारी ३३ वर्षीय परिचारिका तस्लीम ३० जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता होती. ती रुद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका होती. ती ड्युटी संपवून बाहेर पडली. परंतु ती घरी पोहोचलीच नाही. या प्रकरणी तस्लीमच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३१ जुलै रोजी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून तिचा शोध सुरू केला.
- गेल्या गुरुवारी डिबडीबा परिसरातील वसुंधरा एन्क्लेव्हच्या जवळ रिकाम्या प्लॉटजवळ मृत व्यक्तीकडून चोरीला गेलेल्या मोबाईचे लोकेशन हे बरेली येथे सापडले. त्याचा मोबाईल बरेली येथील रहिवासी धर्मेद्र वापरत असल्याचे समोर आले. जेव्हा पोलिसांचे पथक बरेलीला पोहोचले, तेव्हा तो कुटुंबासह फरार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवून त्याला राजस्थानमधून अटक केली आहे.