क्राईम
वहिनी आणि दिराचे तसले संबंध

मेरठ पोलिसांनी आदिल हत्याकांडप्रकरणाचा खळबळजनक खुलासा केला आहे. हत्येचे कारण मालमत्तेचा वाद नसून मृताच्या पत्नीचे तिच्या दिरासोबतच अनैतिक प्रेमसंबंध होते.
दोघांनी पती आणि इतर कुटुंबीयांना नशेचा चहा पाजला आणि नंतर आदिलची हत्या केल्याची माहिती तपासा दरम्यान पुढे आली आहे. सरधना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नानू गावामध्ये ही घटना घडली आहे.
रशीदचा मोठा मुलगा आदिल याला त्याच्या मावशीने दत्तक घेतले होते. भूमिया पूल येथे असलेल्या घरात ते राहत होते. तो कधी कधी नानू या गावी जायचा. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी आदिलचे मुझफ्फरनगर येथील रहिवासी गजालासोबत लग्न झाले. दोघेही शहरात एकत्र राहू लागले.
लग्नाच्या सुमारे एक वर्षानंतर वहिनी ही दिराच्या प्रेमात पडली.आदिल जेव्हा नानू गावात जायचा तेव्हा गजाला अगोदरच नशेच्या गोळ्या विकत घ्यायची आणि तिथे गेल्यावर ती चहात मिसळून सर्वांना द्यायची.
नशेचा चहा पिऊन सगळे झोपी जायचे. यानंतर गुलफाम हा दिर आणि गजाला ही वहिनी एकत्र राहत होते. दोघांचे अनेक दिवस हे सुरू होते. एके दिवशी आदिलला हे कळल्यानंतर त्याने याला विरोध केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजालाने गुलफामसोबत मिळून आदिलच्या हत्येचा कट रचला. यानंतर लग्न करायचे त्यांनी ठरवले.
गजालाने पती आदिल आणि कुटुंबीयांना नशेचा चहा प्यायला लावला आणि आदिलची धारदार शस्त्राने हत्या केली. पोलिसांनी आरोपी गुलफामला अटक केली आहे, तर गजालाचा शोध सुरू आहे.