सोलापूर
खुशखबर! होटगी रोड विमानतळ सुरु करण्याच्या मोठया हालचाली
सोलापूर होटगी रोड विमानतळाच्या सुरक्षा डिझाइन्स, नवीन सुविधांचे बांधकाम, विद्यमान डिझाइन आणि सुविधांमध्ये बदल तसेच सुरक्षा गॅझेट आणि सुरक्षा मनुष्यबळ याबाबत तपासणीसाठी विशेष अधिकाऱ्यांची टीम सोलापूर होटगी विमानतळावर दाखल झाली आहे.
या सर्वेक्षणाचे आयोजन खासदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीनुसार करण्यात आले आहे. याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय मंत्री किंजराप्पू नायडू यांना अलीकडे निवेदनाद्वारे विनंती केली होती. सर्वेक्षणानंतर, सोलापूर विमानतळास भारतीय नागरी विमानपत्त्याचे महानिदेशालय (डीजीसीए) लायसन्स देणार आहे. डीजीसीए लायसन्स मिळाल्यानंतर सोलापुरात विमानसेवा सुरू होईल, ज्यामुळे सोलापूर आणि त्याच्या आसपासच्या भागात प्रवास सुलभ होईल.
या महत्वाच्या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना व व्यवसायांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. विमानसेवा सुरू झाल्याने सोलापूरच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात लक्षणीय योगदान होईल, असे मानले जात आहे.
या सर्वेक्षणाच्या अंतिम अहवालाची आणि डीजीसीएच्या लायसन्सची अपेक्षित माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.