बिजनेस

कमी बजेटमध्ये लाँच झाली भन्नाट कार

भारतीय बाजारपेठेत Citroen Basalt SUV Coupe ही कार लाँच झाली आहे. Citroen ने ही नवीन SUV बाजारात आणली आहे ज्याची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये आहे. Citroen Basalt ची ही कार 31 ऑक्टोबरपर्यंत जे लोक बुक करतील, त्यांनाच या किमतीत ही कार मिळणार उपलब्ध असेल. या तारखेनंतर या कारची किंमत बदलली जाण्याची शक्यता आहे.
Citroen Basalt ही 1.2-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असणार आहे. या कारचे इंजिन 82 bhp पॉवरदेण्यास सक्षम असणार आहे. या इंजिनला 5-स्पीड गिअर बॉक्स बसवण्यात आला आहे. त्याचे टॉप-एंड मॉडेल 1.2-लिटर टर्बो युनिट इंजिनसह सुसज्ज असेल, जे 110 bhp पॉवर जनरेट करेल. या इंजिनसोबत 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर जोडले गेले आहे.
Citroen Basalt ही कार C3 Aircross वर आधारित आहे. या कारचे डिझाइन आणि लूक ही तिची ओळख आहे. या वाहनात बसवलेले 2-पार्ट ग्रिल त्याच्या डिझाइनला एक आकर्षक लुक देत आहे. या कारमध्ये नवीन एलईडी प्रोजेक्टर वापरण्यात आला आहे. या नवीन SUV मध्ये 16-इंच अलॉय व्हील्स देखील आहेत.

Related Articles

Back to top button