महाराष्ट्र
…तर तुमच्या खात्यातून दीड हजार रुपये परत घेणार
यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. घोषणेपासून या योजनेला राज्यातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत या योजनेसाठी एक कोटींहून अधिक महिलांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले असून अजूनही अर्ज केले जात आहेत.
या योजनेच्या प्रचारासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र दुसरीकडे विरोधकांकडून या योजनेवर टीकाही केली जात आहे. त्यातच आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री या योजनेवरुन वादग्रस्त विधान केले आहे.
अमरावतीत आज आमदार राणा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रमानपत्र वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महिलांना संबोधित करताना आमदार राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले.

आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. जे मला आशीर्वाद देणार नाही, मी तुमचा भाऊ असून दीड हजार रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असे धक्कादायक विधान आमदार राणा यांनी केले.