चार लग्न; अश्लील व्हिडिओ अन् दारुचे व्यसन

कोलकात्यात येथे आरजी कार मेदिल कॉलेजमधील एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे देश हादरला आहे. महिला डॉक्टरच्या हत्येविरोधात आज देशभरातील रेसिडंट डॉक्टरांनी बंद पुकारला आहे. आरोपीने ट्रेनी डॉक्टरची हत्या केल्यावर घरी गेला. काही वेळ शांत झोपून त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी कपडे धुतले. मात्र, त्याने शूज साफ करताना चूक केली. त्याच्या बुटावर रक्ताचे डाग आढळले. तसेच त्याचा ब्लूटूथ देखील घटनास्थळी सापडला.
रूग्णालयातील कर्मचारी नव्हता. पण, तो सतत या रुग्णालयात येत होता. शुक्रवारी सकाळी प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. तिच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने ट्रेनी डॉक्टरचा खून करून तो घरी जाऊन झोपला. या आरोपीबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आरोपीने चार लग्न केल्याचे समोर आले आहे.