क्राईम

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणाऱ्या जजसोबत ‘त्या’ पोलिसांची धुळवड

  • मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी याच प्रकरणात निलंबित आणि रजेवर पाठवलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा आनंद लुटल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी काही फोटो ‘एक्स’वर शेअर केले आहेत. दमानियांच्या दाव्याने देशमुख यांच्या हत्येच्या सुनावणीवर संशय व्यक्त केला जात आहे.
  • ‘एक्स’वर पोस्ट करत दमानिया म्हणाल्या, देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत. पण कोणाबरोबर? देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत.
  • आता जर आरोपीला वाचणारे हे निलंबित अधिकाऱ्यांसोबत केस चालू असताना न्यायाधीश होळी खेळत असतील, तर हे खूप चुकीचे आहे, असे दमानिया यांनी म्हटले आहे. दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये फोटो तपासून त्यांची खात्री करण्याचेही आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button