क्राईम

ब्रेकिंग! प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, आयपीएल खेळाडूची होणार चौकशी

सध्या सर्वत्र आयपीएलची चर्चा सुरू आहे. अशातच सनराइजर्स हैद्राबाद टीमचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण एका प्रसिद्ध मॉडेलने आत्महत्या केली आहे. तानिया सिंह असे त्या मॉडेलचे नाव असून तिने आत्महत्या केली आहे. ती सूरत येथे राहणारी होती. आत्महत्येआधी तिने अभिषेक याला शेवटचा फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयपीएलआधी अभिषेक अचडणीत सापडण्याची शक्यता आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी अभिषेकला चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
28 वर्षांची तानिया ही फॅशन डिझाइनर आणि मॉडेल इंडस्ट्रीत काम करत होती. मॉडेलिंगबरोबर ती मेकअप आर्टिस्ट म्हणूनदेखील काम करत असल्याची माहिती तिच्या इन्स्टा बायोमधून समोर आली आहे. दरम्यान तानियाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी सूरतमध्ये तपास सुरू केला आहे. क्रिकेटर अभिषेकचे नाव यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Related Articles

Back to top button