मनोरंजन

ब्रेकिंग! प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शनला खुनाच्या आरोपाखाली अटक

  • प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि त्याच्या नऊ सहकाऱ्यांना बंगळुरू शहर पोलिसांनी आज ताब्यात घेतले आहे. एका हत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. कामाक्षीपाल्या पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एका हत्येप्रकरणी अभिनेता दर्शन आणि त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. या हत्येप्रकरणातील एका आरोपीने दर्शनच्या नावाचा खुलासा केला आहे. दर्शन सतत आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  पोलीस आयुक्त बी. दयानंद म्हणाले, 9 जून रोजी कामाक्षीपाल्या पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एका हत्येप्रकरणी कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान ही कारवाई चित्रदुर्गा इथल्या रेणुकास्वामी नावाच्या एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी झाल्याचे समजते. रेणुकास्वामी हे चित्रदुर्गमधील एका मेडिकल शॉपमध्ये असिस्टंट म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रदुर्ग परिसरातून रेणुकास्वामी यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर शहरातील पश्चिमी भागात असलेल्या कामाक्षीपाल्या येथे त्यांची हत्या करण्यात आली. रेणुकास्वामी यांचा मृतदेह एका नाल्यात आढळला आणि त्यांच्या शरीरावर जखमेच्या काही खुणा होत्या.
  • या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्याविषयी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. पोलीस आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितले की, रेणुकास्वामी हे दर्शनच्या पत्नीला आक्षेपार्ह मेसेज आणि कमेंट पाठवत होता. यामुळेच ही घटना झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button