राजकीय
ब्रेकिंग! उद्धव ठाकरे गटाला खिंडार, महिला प्रवक्त्याचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलेच यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. त्यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष उद्धव ठाकरे गटाला गळती सुरु झाली. शिवसेनेच्या प्रवक्ता संजना घाडी यांच्यासह पती संजय घाडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
- संजना घाडी मुंबईतील ठाकरे गटाच्या बड्या नेत्या मानल्या जात होत्या. कित्येक वर्ष त्या महापालिकेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. तर उपनेते असतानाही त्यांना प्रवक्त्यांच्या यादीतून वगळण्यात आले होते. तेव्हापासून संजना घाडी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेरीस संजना घाडी यांचे प्रवक्तेपदी नावही जाहीर करण्यात आले होते. तरीही आज संजना यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला.
- दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या संजना यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश घेतला असून संजना यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.



