महाराष्ट्र
ट्विस्ट! देवाभाऊंचे अभिनंदन करण्याची स्पर्धा?

- राज्यात राजकारणात गेल्या तीन-चार वर्षांपासून टोकाच्या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण गढूळ झाले होते. परंतु आता राज्यातील राजकारण बदलण्याचे संकेत मिळत आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक सामनातून झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनीही फडणवीस यांचे कौतुक केले. या कौतुक सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही फडणवीस यांच्या कामांची स्तुती केली आहे.
- महाराष्ट्रातील बदललेले राजकारण भविष्यात कोणत्या दिशेने जाणार त्याचे संकेत मिळत आहेत.
- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सामना मुखपत्रात फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले होते. फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गडचिरोली दौरा केला. नक्षलप्रभावग्रस्त या भागात फडणवीस यांनी दौरा करुन एक आदर्श निर्माण केल्याचे सामनामध्ये म्हटले.
- आता सुळे यांनी म्हटले की, महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी चांगले काम करत असेल तर त्यात फक्त फडणवीस यांचे नाव घेता येईल.



