महाराष्ट्र

SIT पथकातही वाल्मिक कराडचे चाहते?

बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. देशमुख हत्या प्रकरणात काल सर्वात महत्त्वाची घडामोड घडली असून मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी पथकावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. एसआयटी पथकातील दोन अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. यातील एका अधिकाऱ्यासोबत वाल्मिकचा एक फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्यामुळे या एसआयटीवरुन आता नवा वाद सुरू झाला असून सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनीही हा तपास निष्पक्ष कसा होईल, असा सवाल उपस्थित करीत आहेत.  

या फोटोमध्ये एसआयटीतील पोलीस अधिकारी हे वाल्मिकची गळाभेट घेत असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये एसआयटीतील पीएसआय महेश विघ्ने असल्याचे सांगितले जात आहे. एसआयटीमधील PSI महेश विघ्ने यांच्यासह पोलीस हवालदार मनोज कुमार वाघ यांचे आणि वाल्मिकचे जवळचे संबंध असल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून केला आहे.

Related Articles

Back to top button