ब्रेकिंग! मुख्यमंत्र्यांचा आजचा सोलापूर दौरा रद्द

सोलापूर :- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा आज होम मैदान येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्हाभरातून 35 ते 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे प्रत्येक कामाची व करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची अत्यंत बारकाईने माहिती घेऊन संबंधित विभागांना मार्गदर्शन करत आहेत.
महिला लाभार्थी यांची ने- आण करणे, त्यांच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था आरोग्य पथक, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आदी अत्यंत काटेकोरपणे सर्व संबंधित यंत्रणा काम करत आहेत. एकंदरीत प्रशासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सज्ज झालेले आहे.
दरम्यान आजचा मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व दौरे रद्द झाले आहेत. तसेच कॅबिनेटची बैठक रद्द झाल्याची माहिती मिळत आहे.