राजकीय

ब्रेकिंग! पंकजा मुंडेंना धक्का

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे.

दरम्यान, बीड मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री सुरेश नवले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. काहीच दिवसांपूर्वी नवले यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला होता.
एकनाथ शिंदे यांच्याकडे लाभार्थ्यांची गर्दी होत असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत नवले यांनी शिंदेंच्या शिवसेनेला रामराम केला होता.आता त्यांनी सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. बीडमध्ये नवले यांची मोठी ताकद आहे. त्यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीची ताकद वाढली असून महायुतीला झटका बसला आहे. 

Related Articles

Back to top button