महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात उष्णतेची लाट आणखी किती दिवस?

राज्यात सूर्य आग ओकत आहे. तापमानाने उच्चांक गाठला आहे. ही उष्णतेची लाट पुढील काही दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला आहे. 
प्रामुख्याने मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर, धाराशिव, जालना व नांदेड जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे तसेच बाहेर जाताना टोपी, रुमाल, स्कार्फ, गॉगल लाऊन बाहेर पडावे आणि सोबत पाण्याची बॉटल ठेवावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणाच्या खालच्या स्थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही दक्षिण पुर्व मध्य प्रदेश ते कर्नाटकपर्यंत जात आहे. ही द्रोणीका रेषा विदर्भ आणि मराठवाड्यातून जात आहे. 
परिणामी राज्यातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस वातावरण उष्ण व दमट राहील. मध्य महाराष्ट्रातील सोलापूरसह काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 

Related Articles

Back to top button