महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात मुसळधार पावसाचा हाहा:कार

  • जून महिन्यात हजेरी लावणाऱ्या मान्सूनने यंदा 12 दिवस आधीच हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याकडून रविवारी करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत असून नदी आणि नाल्यांना पूर आला. राज्यात कुठे आणि किती पाऊस पडला आहे? याबाबत आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
  • सीएमओ कार्यालयाने ट्वीट करताना म्हटले की, मुख्यमंत्री फडणवीस हे राज्यातील पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत असून संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत.
  • राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. बारामतीत 25 घरांशी अंशत: पडझड झाली असून पुरात अडकलेल्या सात जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाइल सेवा रविवारी विस्कळीत झाल्या होत्या, त्या आता पूर्ववत होत आहेत. इंदापूर येथे दोन जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.
  • सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात सहा नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात तीन जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरू आहे.

Related Articles

Back to top button