क्राईम
शिवशाहीत अत्याचार करणारा हाच तो दत्ता गाडे, फोटो आला समोर

- स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचा फोटो समोर आला आहे. २६ वर्षीय तरुणीवर बसमध्ये अत्याचार केले असून सध्या तो फरार आहे. पोलिसांनी चौकशीसाठी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले आहे. आरोपीचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याच्या भावाला शिरूर येथील त्याच्या राहत्या गावातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आठ टीमकडून आरोपीचा शोध सुरु आहे.
- गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. या अगोदर गाडेवर शिरुर पोलिस स्थानकात चोरीचे, साखळी चोरल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गाडे हा स्वारगेट स्थानकात वावरत होता. सकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
- या प्रकरणी गाडेवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे गाडेची ओळख पटवली आहे. आरोपीच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे.



