2022 मध्ये या भारतीय फलंदाजाने केल्या सर्वाधिक धावा

पुढील वर्षी भारतात वनडे वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारताकडून तगडे प्रयत्न केले जात आहेत. मायदेशातच ही स्पर्धा खेळली जात असल्याने भारतीय संघ याचा फायदा उचलणार का, हे पाहावे लागेल. दरम्यान 2022 मध्ये काही भारतीय खेळाडूंनी मैदानावर कमाल केली. यंदाच्या वर्षी भारताकडून कुठल्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तरे देऊ.
यंदाच्या वर्षी भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयश अय्यरने सर्वाधिक 1609 धावा केल्या. त्याने 39 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. यामध्ये एका शतकासह 14 अर्धशतकांचा समावेश आहे. 113 ही त्याची सर्वाधिक खेळी ठरली. टी-ट्वेंटीमधील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी यंदाचे वर्ष महत्त्वाचे ठरले.
त्याने या वर्षी 1424 धावा केल्या. त्याने 43 डावांमध्ये ही कामगिरी केली. यात त्याने दोन शतके झळकवली. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. 43 सामन्यांमध्ये त्याने 1380 धावा केल्या.
यामध्ये त्याने तीन शतक ठोकले. या यादीत या विराट कोहलीचा चौथा क्रमांक लागतो. त्याने 37 सामन्यांमध्ये 1348 धावा केल्या. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी हे वर्ष वाईट गेले. तरीदेखील त्याने या वर्षात 995 धावा केल्या. 19 सामन्यांमध्ये सहा अर्धशतकांसह त्याने ही कामगिरी केली.