बाईक ट्रेनर हवा, पण कन्या राशीचा नको, कारण…

रोज नवनव्या गोष्टींसाठी वर्तमानपत्रात ‘पाहिजेत’ असा मथळा असणाऱ्या जाहिराती आपण वाचत असतो. मात्र एका अवलियाने दिलीली एक जाहिरात प्रसार माध्यामांवर व्हायरल झाली आहे. ही जाहिरात इतकी व्हायरल झाली आहे की, ही जाहिरात आजवर तब्बल ५ लाख लोकांनी पाहिली आहे आणि या जाहिरातला तब्बल साडेसहा हजार लाईक्स आले आहेत. या व्यक्तीने दिलेली जाहिरात इतकी वेगळी आणि विचित्र प्रकारची आहे की, ही जाहिरात वाचणारी व्यक्ती हसून हसून पोट धरल्याशिवाय राहाणार नाही.
प्रवीणभाई सुदानी नावाच्या व्यक्तीने इंग्रजी वर्तमानपत्रात ही जाहिरात दिली आहे. प्रवीणभाईंना बाईक शिकायची आहे. आपल्याला बाईक शिकवणारा ट्रेनर हवा आहे, इतपत जाहिरात समजू शकतो. मात्र आपला बाईक ट्रेनर होण्यासाठी या प्रवीणभाईंच्या काही अटी आहेत. यातली मोठी अट म्हणजे हा बाईक ट्रेनर जेमिनी म्हणजेच कन्या राशीचा नसावा, याचं कारणही प्रवीणभाईंनी दिलं आहे. कन्या राशीचे लोक अत्यंत बेजबाबदार असतात, असं प्रवीणभाईंचं म्हणणं आहे.
हा बाईक शिकवणारा अंगावर ओरडणारा नसावा, कारण चार लोकांमध्ये अंगावर ओरडून बाईक शिकायची असेल तर मी माझ्या वडिलांकडून बाईक शिकली असती, असं प्रवीणभाई म्हणतायत.
मला चार लोकांमध्ये अपमानित करणारी व्यक्ती माझी बाईक ट्रेनर असावी, असं प्रवीणभाईंचं म्हणणं आहे. या जाहिरातीने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला. एक जाहिरात लाखोंच्या घरात सोशल मिडियावर लोकप्रिय झाली आणि प्रवीणभाई ट्विटरच्या माध्यमातून घराघरात पोहोचले.