सोलापूर

राष्ट्रवादीला धक्का! महेश कोठे शिंदे गटात जाणार ?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू महेश कोठे आता शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी हा गौप्यस्फोट आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून शिंदे गटात इनकमिंग सुरू झाले आहे. 

त्यातच, सोलापूरचे माजी महापौर कोठे हे शिंदे गटाचे आगामी आमदार असतील, असा दावा चिवटे यांनी केला. रविवारी लिंगायत समाजाच्या एका कार्यक्रमात चिवटे बोलत होते. यावेळी महेश कोठे आणि सुधीर खरटमलसह अनेक नेते उपस्थित होते. 
माजी महापौर महेश अण्णा कोठे, बाळासाहेबांच्या शिवसेनेतील भावी आमदार आहेत. महेश अण्णा हे लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील. मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील कोठेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे, असे चिवटे म्हणाले. 

Related Articles

Back to top button