प्रियाने देशासाठी आणले सुवर्णपदक मात्र…

सध्या युवा पिढीमध्ये बॉडी बिल्डिंगची क्रेझ वाढली आहे. या प्रकारात दररोज नवे यशाचे शिखर घातले जात आहे. अलीकडे राजस्थानमधील एका महिला बॉडी बिल्डरने नवा विक्रम केला. देशासाठी तिने गोल्ड मेडल जिंकले. प्रिया सिंग असे या महिला खेळाडूचे नाव आहे.
काही दिवसापूर्वीच थायलंड मधील पटाया येथे झालेल्या या स्पर्धेत प्रियाने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.
या कामगिरीबद्दल प्रियावर सध्या सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रियाने आपल्या देशाचे नाव उज्वल केल्याने तिचे कौतुक होत आहे. मात्र दुर्दैवाने सरकारने प्रियाला अद्याप पर्यंत कसलीही मदत जाहीर केली नाही. एवढी मोठी कामगिरी केल्यानंतर देखील केंद्रातील मोदी सरकारने अथवा राजस्थानमधील अशोक गहलोत सरकारने तिचा अद्याप पर्यंत सन्मान केला नाही.
इतकेच नव्हे तर जेव्हा ती थायलंड वरून भारतात परतली तेव्हा ती एअरपोर्टवरून घरी एकटीच गेली. प्रिया दलित असल्यामुळे तिच्यावर अन्याय केला जात आहे, असा आरोप सोशल मीडियावरून केला जात आहे. तर दुसरीकडे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी एक ट्विट करून प्रिया सिंगच्या प्रतिभेचा सन्मान केला. जातीवादामुळे भेदभाव केला जात असल्याचा आरोप प्रियाने एका मुलाखतीतही केला होता.