सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्यांना पोलिसांचा दणका

  • सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन प्रकरण तापले आहे. दरम्यान सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अक्कलकोटमध्ये औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्या 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  • अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावामध्ये औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्या 14 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीनंतर सोलापूर ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे. 
  • मैंदर्गी गावातील 14 जणांच्या विरोधात तर तालुक्यातील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघांमध्ये औरंगजेबचे स्टेटस ठेवण्याचे प्रमाण वाढत असल्याची खंत आमदार कल्याणशेट्टी यांनी अलीकडेच विधानसभेत व्यक्त केली होती. सामाजिक सलोखा बिघडवला जात असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी ही कारवाई केली. यापुढे अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात आणखी कडक कारवाई करणार असल्याचा इशारा सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button