क्राईम

आफताबचा फास आवळणार! जंगलात सापडलेल्या श्रद्धाच्या हाडांनी भक्कम पुरावाच दिला

  • श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. श्रद्धाचा वडिलांचा डीएन सापडलेल्या हाडांशी जुळला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांना महरौली आणि गुरुग्रामच्या जंगलात सापडलेली हाडं ही श्रद्धाचीच असल्याचे सिद्ध झाले आहे. या जंगलातून गोळा केलेल्या सर्व हाडांचे सॅपल्स सीएफएसएलला पाठवण्यात आले होते. आरोपी आफताबच्या कबुलीनंतर ही हाडं जप्त करण्यात आली होती. आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीचा रिपोर्टही दिल्ली पोलिसांना मिळाला आहे. आफताबने श्रद्धाची निघृण पद्धतीने हत्या केली. यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करत ते दिल्लीच्या जंगलात फेकले.
    गेल्या आठवड्यात श्रद्धाचे वडील विकास यांनी त्यांच्या मुलीची निघृण हत्या करणाऱ्या तिच्या लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान विकास यांनी वसई पोलिसांवरही निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गंभीर आरोप केले आहेत. विकास यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी अनेक खुलासे केले होते.

Related Articles

Back to top button