खुशखबर! ऑनलाईन पेमेंटसाठी आता स्मार्टफोनची गरज नाही
देशात डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणात केले जात आहे. दुर्गम भागातील नागरिकसुद्धा मोबाईलने पेमेंट करतात. जे लोक डिजिटल पद्धतीने व्यवहार करतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पेमेंट करण्यासठी आता मोबाईलची गरज राहणार नाही. स्मार्टवॉचच्या सहाय्याने तुम्ही बिल पेमेंट करू शकतात.
एअरटेलने असा स्मार्टफोन लॉन्च केला, त्यातून तुम्ही सहज पेमेंट करू शकाल.
Wearable ब्रँड Noise ने एअरटेल पेमेंट्स बँक आणि मास्टरकार्डसोबत भागीदारी केली. या स्मार्टवॉचद्वारे युझर्स एक रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत पैसे देऊ शकतात. कंपनीने पेमेंटच्या सोयीनुसार या स्मार्टवॉचमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. या स्मार्टवॉचची किंमत २ हजार ९९९ रुपये आहे. यासोबतच हे घड्याळ तीन रंगांत उपलब्ध आहे. या रंगांमध्ये काळा, राखाडी आणि निळा यांचा समावेश आहे.
या घड्याळात १.८५ इंच डिस्प्ले देण्यात आले असून जे ५५० निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करत असते. यासह हे घड्याळ तुमच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेते. या घडळ्यात देण्यात आलेल्या फीचर्समध्ये हृदयाचे ठोके मॉनिटर, स्लीपलेस ट्रॅकर, मासिक पाळी मॉनिटर आणि १३० स्पोर्ट्स मोड समाविष्ट आहे.