बिजनेस

एक एप्रिलपासून होणार महत्त्वाचे बदल

येत्या एक एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. हे आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर अनेक बदल होतील. या नव्या बदलांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले नाही तर याचा आर्थिक फटका आपल्याला बसू शकतो. यावर्षी गुंतवणूक योजना, फास्टॅग, पीएफसंदर्भात अनेक मोठे बदल होणार आहेत.
एक एप्रिलपासून एनपीएस म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये बदल होणार आहेत. कारण की, एक एप्रिलपासून पेन्शन फंड रेग्युलेटरने नॅशनल पेन्शन सिस्टमच्या सध्या सुरू असलेल्या लॉगिन प्रक्रियेत बदल करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे इथून पुढे NPS खात्यात लॉग इन करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची गरज असेल. हे खाते ओटीपीद्वारे ओपन करता येईल.
एक एप्रिलपासून नवीन कर प्रणाली डीफॉल्ट कर प्रणाली असेल. करदात्यांनी अजूनही कर भरण्याची पद्धत निवडली नसेल त्यांना नव्या कर प्रणालीअंतर्गत आपोआप कर भरावा लागेल.
पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख ही फक्त 31 मार्चपर्यंत आहे. या तारखेपर्यंत आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही, तर पॅन क्रमांक रद्द केला जाईल. त्यामुळे तुम्हाला कोणतेही बँक खाते उघडता येणार नाही. तसेच आर्थिक मोठे व्यवहार करता येणार नाही. पुन्हा पॅन कार्ड सक्रिय करण्यासाठी एक हजार रुपये भरावे लागतील.
येत्या एक एप्रिल पासून EPFO संदर्भात नवीन नियम लागू होतील. या नवीन नियमानुसार एखाद्या व्यक्तीने त्याची जुनी नोकरी बदलली तरी त्याचा जुना पीएफ ऑर्डर मोडमध्ये ट्रान्सफर करण्यात येईल. यामुळे नोकरी बदलताना पीएफची रक्कम हस्तांतरित करण्याची प्रक्रिया करावी लागणार नाही.

Related Articles

Back to top button