क्राईम
दुहेरी हत्याकांडाने राज्य हादरले

राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून दोघांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. भीमराव पाटील आणि मुकुंद पाटील अशी मृतांची नावे आहेत.
आरोपीने त्यांची हत्या केल्यानंतर एका घरावर देखील हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. आरोपी हा सायको किलर असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे कुडण गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या गावात गेल्या काही दिवसापासून एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत होता.
सदर हा इसम हा मानसिकरित्या विक्षिप्त होता. त्यामुळे कोणी त्याची दखल घेतली नाही आणि त्याच्याकडे लक्ष दिले नाही. दरम्यान गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास त्या इसमाने एका वृद्ध व्यक्तीवर कुऱ्हाडीने वार करून त्याचे मुंडकच धडावेगळं केले.
आरोपीने हत्या केल्यानंतर तो पसार झाला नाही तर मृतदेहा शेजारीच बसून राहिला होता. दरम्यान त्या मृत इसमाचा भाऊ त्याला शोधण्यासाठी तिकडे आला असता आरोपीने त्याच्यावर देखील कुऱ्हाडीने वार करुन त्याची निर्घृण हत्या केली. भीमराव पाटील आणि मुकुंद पाटील अशी मृतांची नावे आहेत. या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी शांत बसला नाही.
आरोपी तिसऱ्या एका इसमाच्या घरावर गेला आणि दारावर कुदळीने वार करू लागला. दरम्यान घराचा दरवाजा बंद असल्याने आरोपीला आत शिरता आले नाही.
मात्र हा हल्ला पाहून घरातील लोकांनी आरडाओरड सुरु केली. यानंतर स्थानिक एकत्र जमा झाले. कुटुंबियांनी आरडाओरड केल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला होता. अंधाराचा फायदा घेऊन आरोपी फरार झाला आणि गावाबाहेर असलेल्या एका तलावाजवळील दलदलीत जाऊन तो लपला होता. दरम्यान या हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर सुमारे 150 पोलिसांचे पथक आरोपीच्या शोधात निघाले. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी दलदलीत लपून बसलेल्या आरोपीला बाहेर खेचून काढले आणि अटक केली.