सोलापूर
सोलापूर! खिशातील चाकू काढून तरुणावर केले वार

सोलापूर (प्रतिनिधी) खिशातून चाकू काढून तरुणाच्या मानेवर आणि हाताच्या पंजावर वार करून जखमी केल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शांतय्या अनाथ आश्रम जवळील मैदानात घडली. याप्रकरणी प्रकाश भीमाशंकर कोळी (वय-२८,रा.बसवेश्वर नगर नई जिंदगी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून गौरीशंकर नारायण कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी हे विजय नगर सोलापूर येथे थांबलेले असताना वरील संशयित आरोपी याने फिर्यादी यांच्या जवळ येऊन फिर्यादी यांना वरील ठिकाणी फिर्यादीच्या पत्नीला घेऊन येतो असे सांगून सांगितले.त्यावेळी तेथे आल्यानंतर फिर्यादीस शिवीगाळ करून दमदाटी करत विनाकारण खिशातून चाकू काढून फिर्यादी यांच्या मानेवर व हाताच्या पंजावर मारून गंभीर दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साळुंखे हे करीत आहेत.