ब्रेकिंग! एक मेपासून ‘या’ वाहनांच्या नियमात बदल

एक मेपासून अनेक बदल होणार असून काही नियम बदलण्याची शक्यता आहे.
एक मेपासून पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँकच्या एटीएम व्यवहारावर शुल्क आकारले जाणार असून ज्या ग्राहकांच्या खात्यात पुरेशी रक्कम नाही, अशा ग्राहकांच्या एटीएम व्यवहारावर शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्काची किंमत १० रुपये + जीएसटी इतकी असणार आहे. याशिवाय बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या नियमात बदल होणार असून आता या वाहनांवर परमिट शुल्क आकारले जाणार नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.
प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सीएनजी आणि एलपीजीच्या किंमती जाहीर केल्या जातात. एक एप्रिल रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ९१.५० रुपयांची घट करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत २.०२८ रुपये झाली होती. यानंतर आता एलपीजी सिलिंडरसह विविध वस्तूंच्या किंमतीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.



