- पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात अल्पसंख्य हिंदू समुदायातील एक महिला प्रथमच सहायक आयुक्तपदी नियुक्त झाली आहे. कशिश चौधरी असे या 25 वर्षीय हिंदू महिलेचे नाव असून ती बलुचिस्तानमधील चगाइ जिल्ह्यातल्या नौशकी गावची रहिवासी आहेत. दरम्यान पाकिस्तानसाठी हा मोठा दणका आहे.
- बलुचिस्तान लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत ती पात्र ठरली आहे. कशिशने तिचे वडील गिरधारी लाल यांच्यासोबत क्वेटा येथे बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुग्ती यांची भेट घेतली आणि ती महिला आणि अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रांताच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांना सांगितले.
- अलिकडच्या वर्षांत, पाकिस्तानमध्ये हिंदू समुदायातील महिलांनी पुरुषप्रधान क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे, त्यांनी महत्त्वाच्या पदांवर पोहोचण्यासाठी अनेक सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक अडथळ्यांवर मात केली आहे.
ब्रेकिंग! पाकिस्तानला नवा दणका
