खेळ

मोहम्मद सिराजवर आयसीसीची मोठी कारवाई

  • टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्या लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, भारतीय स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजवर आयसीसीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. माहितीनुसार, आयसीसीने सिराजवर एकून मॅच फीसचा 15 टक्के दंड ठोठावला आहे. सिराजला विराट स्टाईल सेलिब्रेशन नडल्याचे पहायला मिळत आहे.
  • या सामन्याच्या चौथ्या दिवशी सिराजने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात बेन डकेटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विकेट घेतल्यानंतर सिराजने जोरदार आनंद साजरा केला. मात्र आनंद साजरा करताना सिराज डकेट जवळ पोहचला. या दरम्यान दोन्ही खेळाडूंचे खांदेही एकमेकांना आपटले. यावरुन आता आयसीसीने सिराजवर कारवाई केली आहे आणि सिराजला सामना शुल्काच्या 15 टक्के दंड ठोठावला आहे. याआधी दुसऱ्या दिवशीही सिराज पंचांशी भांडताना दिसला होता. तथापि, त्यावेळी आयसीसीने सिराजविरुद्ध कोणतीही कारवाई केली नव्हती.

Related Articles

Back to top button