क्राईम

ब्रेकिंग! वारकऱ्यांना कोयता दाखवत लुटले, अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  • सध्या आषाढी वारी सुरु असल्याने संपूर्ण राज्यात एक भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. लाखो लोक ‘माऊली माऊली’ चा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहे. तर दुसरीकडे दौंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे.
  • समोर आलेल्या माहितीनुसार, पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून त्यांच्यासोबत लुटमारीची घटना घडली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींना अटक करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्यातून होत आहे.
  • माहितीनुसार, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. चहा घेतल्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरुन आले आणि त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला आणि वारकऱ्यांना लुटले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. या धक्कादायक घटनेनंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरु केला आहे.

Related Articles

Back to top button