मनोरंजन

‘हा’ अभिनेता साकारणार मनोज जरांगे पाटील

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यातील प्रवास आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. जरांगे यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, ‘संघर्षयोद्धा’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकताच सुरु झाले आहे. पण कोणता अभिनेता जरांगे यांची भूमिका साकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या अभिनेत्याचे नाव समोर आले आहे.
साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी “संघर्षयोद्धा” जरांगे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केल्यापासूनच लोकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आहे. या चित्रपटात जरांगे यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे. 

गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाचे चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरु आहे.

Related Articles

Back to top button