देश - विदेश

खुशखबर | रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

रेल्वेमध्ये तब्बल नऊ हजार तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. दरम्यान, RRB तंत्रज्ञ भरती अंतर्गत या रिक्त पदांसाठी अर्ज अजून सुरू झालेले नाहीत. 

विविध अहवालांनुसार, याबाबतचे अर्ज 9 मार्चपासून सुरू होतील आणि या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल असेल. साधारणपणे, नोंदणी सुमारे एक महिना सुरू राहणार आहे आणि या दरम्यान उमेदवाराने विहित नमुन्यात फॉर्म भरावा. सविस्तर अर्ज ९ मार्चपासून पाहता येईल.
अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक, एसएसएलसी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
या भरती प्रक्रियेतून एकूण नऊ हजार पदे भरली जाणार असून यापैकी 1100 पदे टेक्निशियन ग्रेड I सिग्नलची आहेत. 7900 पदे टेक्निशियन ग्रेड III सिग्नलची असून या भरतींचा तपशील 9 मार्च रोजी प्रसिद्ध झाल्यानंतरच अचूक माहिती देता येणार आहे. नवीन माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट – recruitmentrrb.in ला भेट द्यावी लागेल. 

Related Articles

Back to top button