राजकीय

ब्रेकिंग! लोकसभा निवडणुकीत धमाका होणार ; भाजपचा मेगाप्लान

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. राष्ट्रीय अधिवेशन संपल्यानंतर दुपारी बैठक होणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
ज्या जागांवर 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्या जागांवरील उमेदवारांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि समितीचे सदस्य देवेंद्र फडणवीस हे देखील बैठकीला उपस्थित असणार आहेत. या महिन्याच्या शेवटी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे.

Related Articles

Back to top button