मनोरंजन

सनी लिओन चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन उत्तर प्रदेश पोलीसमध्ये भरती होणार का? हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे सनीच्या ॲडमिट कार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे हॉल तिकीट सनीच्या नावाने जारी करण्यात आले आहे.
ॲडमिट कार्डवर उमेदवाराचे नाव सनी लिओन असे आहे. ज्यावर अभिनेत्री सनीचा फोटोही आहे. प्रवेशपत्रावर परीक्षेची तारीख 17 फेब्रुवारी आहे. परीक्षेची वेळ सकाळी 10 ते दुपारी 12.05 अशी लिहिली आहे. सध्या प्रवेशपत्राचा फोटो सोशल मीडियावर शेअर व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेश पोलीस भरतीसाठी राज्यातील 75 जिल्ह्यांतील 2385 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली गेली. या दोन दिवसीय परीक्षेत 48 लाखांहून अधिक उमेदवार सहभागी झाले होत आहेत. ही परीक्षा यूपी पोलीस कॉन्स्टेबलच्या 60244 पदांच्या भरतीसाठी घेतली जात आहे. दरम्यान, कन्नौज जिल्ह्यात सनीच्या नावाचे ॲडमिट कार्ड समोर आले आहे.
व्हायरल झालेल्या ॲडमिट कार्डच्या फोटोनुसार, उमेदवाराला तिरवा येथील श्रीमती सोनश्री मेमोरियल गर्ल्स कॉलेजमध्ये परीक्षेला बसायचे होते. उमेदवारांच्या यादीतील या उमेदवाराची माहिती ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कॉलेजला कळताच त्यांना धक्काच बसला. आता यूपी पोलीस अशा व्यक्तीचा शोध घेत आहेत, ज्याने असे प्रवेशपत्र बनवले आहे. मात्र हा कोणाचा तरी खोडसाळपणा असू शकतो, असेही बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button