क्राईम
संतापजनक! भररस्त्यात मिठी मारुन तरुणीचा…

कामावरुन घरी जाणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मिठी मारुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात घडला आहे.
हा प्रकार सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास गाडीतळ रोडवरील तुपे हॉस्पिटलसमोर घडला आहे.
याबाबत महादेवनगर, हडपसर येथे राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शंकर शिवाजी पोळ (वय-30 रा. उदगिर, जि. लातूर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कामावरुन तुपे हॉस्पिटल समोरुन घरी जात होती.
त्यावेळी आरोपी पाठीमागून आला. त्याने तरुणीला अचानक मागून मिठी मारुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. दरम्यान पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.