क्राईम
दुर्दैवी! शाळेत खेळताना तिसऱ्या मजल्यावरून पडला

शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही घटना घडली. मृत मुलाचे नाव सार्थक कांबळे असे होते. काळेवाडीत राहणारा सार्थक पिंपरी चिंचवडमधील हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात होता.
आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास आठव्या वर्गात शिकत असलेला सार्थक तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता. रेलिंगवर घसरगुंडी खेळणे धोकादायक आहे, पडला तर तुला लागेल, असे त्याच्या मित्राने त्याला सांगितले होते. मात्र सार्थकने कोणाचेही ऐकले नाही, तो खेळण्यात मग्न होता. दरम्यान अचानक त्याचा तोल गेला आणि तो तळ मजल्यावर जाऊन पडला. या अपघातात सार्थकच्या डोक्याला जोरदार मार लागला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलीसांनी दिली.



