क्राईम

अखेर ‘त्या’ हत्येचे गूढ उकलले

एका भारतीय कुटुंबाचा त्यांच्या १७ कोटी रुपयांच्या आलिशान बंगल्यात हत्या करण्यात आली होती. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील या घटनेमुळे खळबळ उडाली होती.

अखेर या घटनेचा उलगडा झाला असून धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. आनंद सुजित हेन्री (वय ३७) पत्नी ॲलिस (वय ३८) आणि ४ वर्षांची जुळी मुले नोआ आणि नॅथन यांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. दोन्ही मुलांचे मृतदेह बेडरूममध्ये, तर नवरा बायकोचा मृतदेह बाथरूममध्ये आढळून आला होता. दरम्यान दाम्पत्याच्या मृतदेहाजवळ एक पिस्तूल सापडले होते.
या प्रकरणाचा पोलिस आत्महत्या आणि खून अशा दोन्ही बाजूंनी तपास करत होते. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याच्या रक्ताने माखलेल्या मृतदेहावर ९ एमएम पिस्तुलच्या गोळ्यांच्या खुणा होत्या. लोडेड पिस्तूल बाथरूममध्येच पडले होते. आनंदने आधी मुलांची हत्या केली आणि नंतर पत्नीवर गोळी झाडून आत्महत्या केली. हे भारतीय-अमेरिकन कुटुंब मूळचे केरळचे रहिवासी होते.
आनंद हा सॉफ्टवेअर इंजिनीअर, गुगल आणि मेटाचा माजी कर्मचारी असल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे. तर त्याची पत्नी झिलो नावाच्या कंपनीत डेटा सायन्स मॅनेजर होती. या दोघांनी २०१६ मध्ये लग्न केले होते. मात्र, त्यांनी कोर्टात घटस्फोटाची अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यावर निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, या दोघांनी २०२० मध्ये १७ कोटी रुपयांचा आलिशान बंगला खरेदी केला.
या जुळ्या मुलांच्या रक्ताच्या नमुन्यात अंमली पदार्थांच्या ओव्हरडोस दिल्याचे आढळले आहे. कारण त्यांच्या शरीरावर कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Related Articles

Back to top button