राजकीय

ब्रेकिंग! ममता बनर्जींना तगडा झटका

लोकसभा निवडणुकीच्या आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेस खासदार मिमी चक्रवर्ती यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ममता यांच्याकडे आपला पदाचा राजीनामा दिला आहे. मिमी स्थानिक तृणमूल नेतृत्वावर खूश नसल्याने तिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मिमी हे बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. २०१२ मध्ये त्यांनी चॅम्पिअन सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. आतापर्यंत त्यांनी २५ हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांची लोकप्रियता पाहून तृणमूलने २०१९ मध्ये लोकसभेचे तिकीट दिले होते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिमी जादवपूर मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यांनी भाजपचे अनुपम हाजरा यांना पराभूत केले होते.
दरम्यान या महिन्याच्या सुरूवातीला बंगाली फिल्म स्टार आणि तृणमूल चे खासदार दीपक अधिकारी यांनीही पक्षाला धक्का दिला होता. त्यांनी आपल्या मतदारसंघातील तीन समितींचा राजीनामा दिला होता.

Related Articles

Back to top button