क्राईम
तिने दहा पुरुषांसोबत लग्न केले, सर्वांवर बलात्काराचा आरोप ठेवला

- कर्नाटकातील एका महिलेने दहा लोकांच्या सोबत लग्न केले, त्यांच्यासोबत शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. दहा पुरुषांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल असलेल्या महिलेची माहिती सर्व पोलीस ठाण्यात पाठवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्याच्या डीजीपींना हा आदेश दिला आहे. महिलेने 2011 ते 2022 या कालावधीत दहा पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या निर्देशात न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनी कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग रोखण्याच्या गरजेवर भर दिला.
पी.के. विवेक म्हैसूरमधील हॉटेल ललित महल पॅलेसमध्ये एका व्यावसायिक व्यवहारासंदर्भात महिलेला भेटला होता. काही दिवसांनंतर महिलेने विवेक आणि त्याच्या कुटुंबावर दोन गुन्हे दाखल केले होते. विवेकने आपल्या याचिकेत न्यायालयाला सांगितले की, महिलेने गेल्या दहा वर्षांत दहा पुरुषांविरुद्ध असेच गुन्हे दाखल केले आहेत.
सीरियल केसेस दाखल करण्याच्या महिलेच्या प्रवृत्तीबद्दल न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. महिलेने तिच्या तक्रारींमध्ये काही पुरुषांना तिचा पती असल्याचे सांगितले आणि काही जणांनी लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार केल्याचा आरोप केला. मात्र, सुनावणीवेळी ती गैरहजर राहिली. पुरावे सादर करण्यासाठीही न्यायालयात पोहोचली नाही. यानंतर उच्च न्यायालयाने पी.के.विवेक आणि त्याच्या कुटुंबावर दाखल करण्यात आलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. पीके विवेक हा हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी असून तो कॉफीच्या मळ्याचा मालक आहे.



