सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! ७५ वर्षीय आजोबाचे भलतेच कांड

- सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाच्या पोलिसांनी सायकल चोरी करणार्या सराईत आरोपीला अटक केली.संशयित आरोपीकडून 14 गुन्ह्यांची उकल करून गुन्ह्यात चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत केला. बाबुलाल शामलाल कुकरेजा (वय-72, रा.चिप्पा चाळ, भैया चौक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकाने केली.
- दरम्यान, शहरातील विविध नगरातील, सोसायटीत दिवसा व रात्री सायकल चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. नमूद गुन्ह्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला.
- यावेळी आरोपी बाबूलाल कुकरेजा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता शहरातील सायकल चोरीच्या गुन्ह्याची त्याने कबुली दिल्यावर त्याला अटक केले. अटक आरोपीकडे तपास करून 14 गुन्ह्यांची उकल करून गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला. वरील प्रमाणे 12 दखलपात्र गुन्हे व दोन अदखलपात्र गुन्हे असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
- ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. दिपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, उमेश पवार, बाळासाहेब काळे यांनी केली.