महाराष्ट्र
ब्रेकिंग! भारतात एचएमपीव्ही व्हायरसचा शिरकाव

HMPV Virus ने भारतात शिरकाव केला आहे. या व्हायरसचे तीन रुग्ण देशात आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आवाहन केले. इतर काही राज्यांमध्ये ह्युमन मेटाप्युमो व्हायरस प्रकरणे आढळून आल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि राज्य सरकार लवकरच परिस्थितीबाबत सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना जारी करेल, असे फडणवीस म्हणाले.