राजकीय

जामीन मिळाल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

  1. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना आज मुंबईतील पीएमएलए कोर्टाने जामीन मंजुर केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
  2. ईडीने राऊतांचा जामीन स्थगित करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकांना फेटाळून लावत राऊतांना दिलेला जामीन कायम ठेवला आहे. जामीन मिळाल्यानंतर राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जामीन कायम ठेवण्याचा निकाल कोर्टाने दिल्यानंतर राऊतांनी ‘आता मी पुन्हा लढेन’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
जामीन मंजुर झाल्याचे समजताच राऊतांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यानंतर त्यांनी ‘मी न्यायदेवतेचे आभार मानतो, न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता की मला न्याय मिळेल, आता मी पुन्हा लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुनावणीवेळी राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत, मुलगी आणि त्यांचे भाऊ कोर्टात उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते.

Related Articles

Back to top button