महाराष्ट्र
पुन्हा ट्विस्ट! तुम्ही मुख्यमंत्री होणार का?

- गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपला पाठिंबा जाहीर केला आणि मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा मुख्यमंत्री पदासाठी जो निर्णय घेतील, तो प्रत्येक निर्णय मान्य असेल, असे शिंदेंनी जाहीर केले. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत, असे म्हटले. मुख्यमंत्री होणार का, असा सवाल केला असता फडणवीसांनी हात जोडले. शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला.
- यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून पुढील वाटचाल ठरवली जाणार असल्याचेही सांगितले.
- यावेळी फडणवीस म्हणाले, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, निश्तिचपणे आम्ही सगळे एकत्रितच आहोत. आमच्या महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितले होते की, सगळे निर्णय सोबत बसून होतील.