सोलापूर ब्रेकिंग! डॉक्टरानी गेम केला पण..

सोलापूर (प्रतिनिधी) शासकीय रक्क्म ८७ लाख २७ हजार ८९० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी डॉक्टरसह तिघांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि घटना २९ सप्टेंबर रोजी शांती चौकातील शासकीय तंत्रनिकेतन येथे घडली.याप्रकरणी डॉक्टर दिलीप मच्छिंद्र घायतिडक (वय-५४,व्यवसाय-नोकरी समन्वयक तथा विभाग प्रमुख,स्थापत्य अभियांत्रिकी विभाग,रा.शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून डॉ.अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय,राजशेखर मारुती कापसे व अनंत शिवाजी जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,डॉ.अशोक उपाध्याय यांनी राजशेखर व अनंत यांच्या मदतीने २९ ऑक्टोबर रोजी वरील रक्कम काढली.व वित्तीय अधिकारी नसताना धनादेशाचा गैरवापर करून संस्थेच्या बँक खात्यातील रक्कम आहरित करून शासनाची फसवणूक केली आहे. संचालक तंत्र शिक्षण विभाग कार्यालय पुणे यांनी कळविल्याप्रमाणे शासकीय तंत्रनिकेतन येथील वरील संशयित आरोपी यांच्यावर शासकीय पैशाचा अपहार केल्याबाबतची फिर्याद वरील संशयित आरोपींविरुद्ध देण्यात आली आहे.असे फिर्यादित नमूद आहे.पुढील तपास पोसई.डेरे हे करीत आहेत.